सोलापूर

Solapur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून आहेरवाडीत तरुणाचा खून

बाप-लेकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना रविवारी (दि. २०) पहाटे घडली. याप्रकरणी वळसंग पोलिसांनी बाप-लेकाला अटक केली आहे. सचिन अभिमन्यू सासवे (वय २४, रा. आहेरवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धोंडीबा छेत्री (वय ४२, रा. आहेरवाडी) व त्याचा मुलगा आयुष्य छेत्री (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

धोंडीबा याला सचिनचे आपल्या पत्‍नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून रविवारी पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान सचिन शेतात झोपला होता. धोंडीबा व मुलगा आयुष्य यांनी तिथे जाऊन त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी सचिनचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित शेतात लपून बसले होते.

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे, वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल डोंगरे, उपनिरीक्षक रतिकांत कोळी, श्रीकांत गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT