Mangalsutra Snatched File Photo
सोलापूर

Solapur Crime: दिवसाढवळ्या महिलेवर हल्ला करुन मंगळसूत्र पळवले

महाळुंग, श्रीपूर आणि बोरगाव परिसरात गेल्या दहा-बारा दिवसांत महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र व सोन्याचे दागिने लुटण्याच्या तब्बल चार घटनांनी खळबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

श्रीपूर : महाळुंग, श्रीपूर आणि बोरगाव परिसरात गेल्या दहा-बारा दिवसांत महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र व सोन्याचे दागिने लुटण्याच्या तब्बल चार घटनांनी खळबळ उडाली आहे. अकलूज पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाळुंग–लवंग रोडलगत ढेरे वस्ती परिसरात १२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शिंदे नामक महिलेवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला करून तिचे मंगळसूत्र लुटल्याची घटना घडली. तसेच २९ जुलै रोजी श्रीपूर–खंडाळी रोडवर लक्ष्मी भिसनाळ या महिला संत तुकाराम महाराज पालखी मार्गाजवळ ओढ्यालगत गवत काढत असताना चोरट्याने तिच्यावर हल्ला करून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे सांगण्यात येते.

५ ऑगस्ट रोजी बोरगाव (ता. माळशिरस) येथे पद्मिनी वाघमारे या प्रमोद कुलकर्णी यांच्या शेतात गवत काढण्यासाठी गेल्या असताना दुपारी बाराच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करून गळ्यातील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली.

याशिवाय महाळुंग–मिरे रोडवर खटके नामक महिला शेतात एकटी काम करीत असताना तिच्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या सर्व घटनांची अकलूज पोलिस ठाण्यात नोंद झाल्याचे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT