भाडेकरूंनी चोरले घर मालकाचे दागिने Pudhari Photo
सोलापूर

Solapur Crime : भाडेकरूंनी चोरले घर मालकाचे दागिने

पोलिसांत गुन्हा दाखल; ऐवज सहा लाखांचा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः भाडेकरू असलेल्या दोन महिलांनी घर मालकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. त्याबाबत एक एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सुवर्णा भागप्पा आजमाने (रा. शांती नगर, मजरेवाडी, सोलापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली.

सुवर्णा या घर उघडे ठेवून शेजारी मोकळ्या जागेत कपडे धुवत होत्या. याचा फायदा घेऊन मालन शेख हिने सुवर्णा यांच्या घरात देव्हाऱ्याजवळ ठेवलेले सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन गंठण, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातले, दोन ग्रॅम सोन्याच्या कानातील दोन पट्टी, तीन ग्रॅम सोन्याची बुगडी, दोन ग्रॅम सोन्याची बाली, सात ग्रॅम सोन्याची बोरमाळ, तीन व दोन ग्रॅमचे सोन्याचे रिंग, दहा ग्रॅमची सोन्याची पिळ्याची अंगठी, चार ग्रॅम सोन्याची बाली, 55 व 66 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, 23 ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट आणि रोख रकमेचा समावेश आहे. चोरी केल्यानंतर मालन हिने सर्व दागिने जैतुन शेख हिच्याकडे दिले. चोरीचा प्रकार घडल्यानंतर सुवर्णा यांनी दोघींना दागिने व पैसे परत करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर सर्व परत करतो, असे सांगितले. परंतु, महिना उलटूनही दागिने, पैसे परत न केल्याने सुवर्णा यांनी पोलिसात धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT