sexual assault case file photo
सोलापूर

Solapur Crime : लग्नाचे आमिषाने अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात

बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून नंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सोहेल बाबू शेख (रा. बालाजी सिम्फोनी, पनवेल, नवी मुंबई) याने मे-जून 2024 पासून ते 2 मार्च 2026 पर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले. त्यानंतर बार्शी येथील लॉजमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडितेला ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला पुणे येथे नेले. तेथे स्वतःच्या राहत्या ठिकाणी जबरदस्तीने गर्भपात संदर्भातील औषधे देऊन तिचा गर्भपात केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सोनम जगताप करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT