टेंभुर्णी : - कला केंद्राच्या अडून सुरू असलेल्या वैश्या व्यवसायाचा पर्दापाश करीत टेंभुर्णी पोलिसांची मोठी कारवाई. एका महिलेसह सहा आरोपीना अटक करण्यात व तब्बल २५ महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.आजवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून यामध्ये परराज्यातील महिलांचा समावेश दिसून आला आहे.पाच आरोपींना पोलीस कोठडी ठोठावली आहे.
ही कारवाई मोडनिंब (ता.माढा) येथील स्वरांजली कला केंद्रात टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन (भापोसे) अधिकारी राहुल आत्राम व त्यांच्या पथकाने १५ मार्च रोजी मध्यरात्री यशस्वीपणे पार पाडली.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून समजलेली अधिक माहिती आधी की,टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांना गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की,मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्र येथील मालक व मॅनेजर कामगार हे पर जिल्ह्यातील व पर राज्यातून महिलांना आणून त्यांच्याकडून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेऊन कुंटणखाना चालवित आहेत.
ही खात्रीलायक माहिती मिळताच पोलीसांनी पंच,डमी ग्राहक यांच्यामार्फत नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. यावेळी मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्राचे मुख्य मालक, चालक, मॅनेजर व स्वागत लॉजचा मॅनेजर, रिक्षा चालक यांचा ही या गुन्ह्यात समावेश असल्याचे दिसून आले. तेथे २५ महिला मिळून आल्या. यातील एका पीडित महिलेकडून हे सराईत आरोपी हे संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे या सर्वांच्याविरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल सहदेव देवकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्यादी दिली. त्यानुसार सर्व आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये कलाकेंद्र चालक १)जगन्नाथ तुकाराम घाडगे (रा.अरण,ता.माढा), २)मॅनेजर विशाल लता पवार (वय-२४,रा.जामखेड ता.अहिल्यानगर), ३)बाळासाहेब गोविंद गिड्डे (वय ६३ वर्षे रा.अरण ता.माढा), व ४) पार्टी मालकीन छाया बाळासाहेब सुरवसे (वय-३५ वर्षे रा.आंबेजोगाई जि.बीड), ५)रिक्षा चालक नितीन चांगदेव चव्हाण (वय ४९ वर्षे,रा.मोडनिंब ता.माढा), ६)स्वागत लॉज मॅनेंजर सिध्दांत सुखदेव गायकवाड (वय-३३ वर्षे रा.मोडनिंब ता.माढा) यांचा समावेश आहे.
अटक सर्व आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा करमाळा उपविभागाच्या अंजना कृष्णा व्ही एस, यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन (भापोसे),पोलीस अधिकारी तथा टेंभुर्णी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम,व पोसई सुनील सरडे,पोसई विलास रणदिवे, पोहेकॉ प्रदीप पर्वते, पोकॉ सहदेव देवकर, चालक नितीन डाकवाले, प्रसाद अनभुले, पोहेकॉ मंगेश पवार, गणेश गुटाळ, पोकॉ भोसले, निकम व प्रभारी अधिकारी टेंभुर्णी यांचे पोलीस मुख्यालयाकडील चालक व आरटीपीसी, महिला पोकॉ धनश्री मांढरे,महिला पोकॉ राज मॅडम यांनी केली आहे.