चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने खून 
सोलापूर

Barshi Crime| चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने खून; पतीला अटक

बार्शीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास खून केला. धनश्री ऋषीकेश पाटील (वय 26, रा. गांधी स्टॉप, गाडेगाव रोड, बार्शी) असे पत्नीचे नाव आहे. तर पती ऋषीकेश संभाजी पाटील (रा. बार्शी) याला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी धनश्री हिचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

धनश्री पाटील ह्या बचत गटाचे काम आटोपून लक्ष्याचीवाडी गावाकडून बार्शीकडे दुचाकीने (क्र. 13 4016) परत येत होत्या. त्यावेळी बार्शी-परांडा रोडवरील एका हॉटेलजवळ त्यांना पती ऋषीकेश पाटील याने अडवले. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यातूनच झालेल्या वादातून त्याने धारदार शस्त्राने धनश्रीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात धनश्री गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT