सोलापूर : आजीला व बापाला नको त्या अवस्थेत मुलीने पाहिल्याने आपल्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, या भितीने नराधम बापाकडूनच पोटच्या गोळ्याची खून करून बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली.
श्रावणी ओगसिध्द कोठे असे मृत मुलीचे नाव आहे. ओगसिध्द रेवणसिध्द कोठे ( वय 35) असे अटक करण्यात आलेल्या नराधम बापाचे नाव आहे. ओगसिध्द रेवणसिध्द कोठे याचे स्वतः च्या आईशीच अनैतिक संबंध होते. आठ वर्षाची चिमुरडी श्रावणी हिने या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. या घटनेची वाच्यता होईल, ही भिती त्याला होती. तसेच बायकोसह घरातील सर्वांना या संबंधाची माहिती कळेल आणि नातेवाईकांसह गावात व समाजात आपली बदनामी होईल, अशी भिती नराधम बापाला होती.
गत गुरुवार ( दि. 22 ) रोजी रात्री श्रावणी हीने आपल्या आजोबाच्या घरी जेवण करून आली. व आपल्या जन्मदाता असलेल्या ओगसिध्द याच्या जवळ झोपण्यासाठी गेली. मध्यरात्री नराधम बापाने श्रावणी हिला फिट आल्याचे भासवून तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारला व तिचा मृतदेह घरासमोर बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मंद्रूप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नायब तहसीलदार व वैद्यकीय अधिकार्यांच्या उपस्थित पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढले.
श्रावणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. व तीच्या उत्तरीय तपासणीत गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी नराधम आरोपी बापाला अटक केले आहे. मंद्रूप पोपलिसांनी मुळापर्यंत जावून तपास केल्याने खुनाचे कारण उघड झाले आहे.
माझ्या बाळाची काहीही चुक नव्हती. तीने पाहिलेली घटना खरीच होती. त्याला आयुष्यभर जेलमध्येच सडू द्या. मी तर म्हणते फाशीच द्या, माझ्या मुलीचा घात केला असून त्याचे तोंडही मला पहायचा नाही.- वनिता कोठे, मृत श्रावणीची आई