Crime News pudhari photo
सोलापूर

Solapur Crime: डॉ. शोनाली वळसंगकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

डॉ. शोनाली - उमा वळसंगकर वाद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : एस. पी. न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनापरवानगी प्रवेश करून गोंधळ घालणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे व शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉ. शोनाली अश्विन वळसंगकर यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उमा शिरीष वळसंगकर (रा. १५८ सी रेल्वे लाईन सोलापूर) यांनी गुरूवारी (दि. २) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्याद दिली आहे.

तक्रारीनुसार, शोनाली अश्विन वळसंगकर यांनी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विरोध केला. तसेच धमकी देत शिवीगाळ करून संबंधितांना बघून घेण्याची दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना १८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील एस. पी. न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे घडली. उमा वळसंगकर यांच्या तक्रारीवरून सदर बझार पोलिसांनी डॉ. शोनाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पुढील तपास सपोनि कुलकर्णी करीत आहेत. पोलिसांकडून घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. उपलब्ध पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT