Crime News Pudhari Photo
सोलापूर

Solapur Crime: बुरखा परिधान करुन बिफ खाण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आंतरधर्मीय विवाह केलेल्या विवाहितेला बुरखा परिधान कर, नमाज पठण करण्यासह बीफ खाण्यासाठी वारंवार दबाव टाकून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्रान शौकत पठाण (रा. विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्‍हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. ऐर्श्वया दत्ता गायकवाड (वय ३०, रा. अत्‍तार नगर, विजापूर रोड, सोलापूर) हिने याप्रकरणी फिर्याद दिली. ऐर्श्वर्याने इम्रानबरोबर २०२० मध्ये प्रेमविवाह केला. ऐश्वर्या ही ब्युटी पार्लर व्यवसाय करते, तर इम्रान लातूर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, २०२१ पासून इम्रानने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तिला बुरखा परिधान करण्याची त्याने सक्ती केली. तसेच नमाज पठण आणि बीफ खाण्यासाठी इम्रान ऐश्वर्यावर सक्ती करू लागला.

ऐश्वर्याने त्यास नकार दिल्यानंतर इम्रान तिला शिवीगाळ करीत मारहाण करत असे. इम्रानच्या या सततच्या छळाला कंटाळून ऐश्वर्याने महिला सुरक्षा कक्षाकडे तक्रार केली. चौकशीनंतर इम्रान पठाणविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार मोहन पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT