Pudhari
सोलापूर

Solapur Crime: मुख्याध्यापिकेशी गैरवर्तन; शिक्षण संस्था सदस्यांवर गुन्हा

शहरातील श्रीमती सरस्‍वती तिपण्णा बालक मंदिर या संस्‍थेत हा प्रकार घडला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्‍या ॲडमिशनचे पैसे द्या, म्‍हणत मुख्याध्यापिकेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी संस्‍थेच्‍या सदस्यांसह पाच जणांविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला. शहरातील श्रीमती सरस्‍वती तिपण्णा बालक मंदिर या संस्‍थेत हा प्रकार घडला.

शाळेच्‍या मुख्याध्यापिका शाळेतील त्‍यांच्‍या केबिनमध्ये बसल्या होत्‍या. यावेळी सिद्राम तट्टे, मोहन मादगुंडी, नरसिंह आदप्‍पा सरला यांच्‍यासह दोन इसम केबिनमध्ये आले. त्‍यांनी शाळेमध्ये ॲडमिशनचे जमा झालेले पैसे मागितले. परंतु मुख्याध्यापिकेने पैसे देण्यास नकार दिला. त्‍यावेळी त्‍यांनी मुख्याध्यापिकेशी गैरवर्तन केले.

अरेरावीची भाषा वापरत तुमच्‍यासारखे दहा मुख्याध्यापक आम्‍ही इथे बसवतो. आताच्‍या आता पैसे द्या नाहीतर तुमची उचलबांगडी करतो, अशी धमकी दिली. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT