नातेपुते : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला नातेपुते गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी (दि.२७) सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, ०३ जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गौरव पोपट होळकर (वय ३१, रा.होळ ता.बारामती) असे आरोपीचे नाव आहे.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दरम्यान पोलिसांकडून मंगळवारी पेट्रोलिंग सुरू असताना शिंगणापूर पाटी येथील हॉटेल गोल्डन ईरा परिसरात काही व्यक्तींकडे गावठी पिस्तूल आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी गौरव होळकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुस आणि एक मॅगझीन असा मुद्देमाल मिळून आला. त्याने अवैध शस्त्र कुठून आणले? त्याचे कोण कोण साथीदार आहेत. त्याबाबत आरोपींकडून कसून तपास करीत आहे
ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने व नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील पोसई सोनल मोरे, पोलीस हे.को. राहुल रुपनवर देविदास धोत्रे, राकेश लोहार, रणजित मदने, व राहुल वाघमोडे यांनी केली.