File Photo
सोलापूर

Solapur Crime: दुचाकीस्वारांना लुटणारा चोरटा गजाआड

दुचाकीवरून कुटुंबासमवेत गावाकडे निघालेल्या तरुणाला सत्तूराने मारून पत्नीच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश

पुढारी वृत्तसेवा

महूद : दुचाकीवरून कुटुंबासमवेत गावाकडे निघालेल्या तरुणाला सत्तूराने मारून पत्नीच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आरोपीस पकडण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यातील कटफळ शिवारात घडली होती.

खवासपूर (ता. सांगोला) येथील वैभव अर्जुन ढेरे हे 14 ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी स्वाती व मुलगा विराज यांचे समवेत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी (क्र.एम.एच.45 ए.व्ही. 0642) वरून खवासपूर या आपल्या गावी निघाले होते. कटफळ शिवारात दुधाळवाडी पाटी ते लांडा महादेव मंदिर रस्त्याने वनीकरण क्षेत्राच्या बाजूला रस्त्यावर आले असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून येऊन वैभव ढेरे याने सत्तूराने जखमी करून पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण हिसकावून नेले होते.

यातील आरोपींबाबत कोणताही ठोस पुरावा नसतानाही सांगोला पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक बाबींच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन योगीराज संजय मोहोटकर (वय 24, बुध, रा. खटाव, जि. सातारा) यास अटक करून न्यायालयात हजर केले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत वाघे, पोलिस हवालदार ढेरे, पोलिस नाईक लेंगरे तसेच सायबर सेलचे पोलिस हवालदार तांबोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT