Fraud Case Pudhari
सोलापूर

Solapur Fraud Case : दीड कोटींच्या अपहार प्रकरणी दांम्पत्यावर गुन्हा

फायनान्स कंपनीतील प्रकार; भागदारकानेच केली तक्रार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : येथील फलटण गल्लीतील रविसागर ऑटो फायनान्स ॲन्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीत एक कोटी ५८ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार आणि फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भागीदार पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन दशरथसा आरसीद आणि शशिकला अर्जुन आरसीद (दोघे रा. राजभोग हाईट, फलटण गल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे होत.

या प्रकरणी कंपनीचे भागीदार संजय भिमाशंकर थोबडे (वय ६५ वर्षे, रा. उत्तर कसबा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ जुलै २०१६ ते २७ जुलै २०२६ अशा दहा वर्षांच्या कालावधीत हा गुन्‍हा पद्धतशीरपणे करण्यात आला. संशयीतांनी रविसागर ऑटो फायनान्स भागीदारी फर्म, रविसागर ऑटो फायनान्स प्रा. लि. कंपनी आणि रविसागर फायनान्स ॲन्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ या कंपन्यांमध्ये संचालक व भागीदार म्हणून काम करताना पदाचा गैरवापर केला.

कंपनीच्या व्यवहारांबाबत संशय आल्यानंतर सी. ए. नागेश बनशेट्टी यांच्याकडून ऑडिट करण्यात आले. या ऑडिटच्या अहवालात संशयीतांनी केलेला कोट्यवधींचा अपहार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी करत आहेत.

बनावट सह्या आणि कर्मचाऱ्यांना धमक्या

संशयीतांनी संगनमत करून कंपनीचा कारभार सांभाळत असताना, कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. इतर भागीदारांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या नकळत बँकेच्या खात्यांवरून व्यवहार करण्यासाठी बनावट सह्या केल्या. बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीच्या खात्यातील कोट्यवधी रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले. याशिवाय बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून वापरली. काही रक्कम इतर कंपन्यांमध्ये मुदत ठेव म्हणून गुंतवल्याचे फिर्यादीत म्‍हंटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT