सोलापूर

Solapur Crime : गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद

बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. ४) पहाटेच्या सुमारास पुणे नाका ते देगावकडे जाणाऱ्या ५४ मीटर रस्त्यावर, जानकर नगर परिसरात करण्यात आली. उफरान ऊर्फ पाप्या मुनीर गोलंदाज (वय २६, रा. गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, देगाव रोड, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गस्तीवर असणारे पोलीस अधिकारी बावणे व त्यांच्या पथकाला उफरानबद्दल संशय आला. तेव्हा त्यांनी संशयिताला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. पिस्तूल बाळगण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे चौकशीत समोर आले.

याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी पाटोळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT