लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस आक्रमक 
सोलापूर

Solapur News : लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस आक्रमक

केंद्र सरकारविरोधात निदर्शने, घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी तसेच दिल्लीत आंदोलक महिला, तरुणांवर होत असलेल्या अत्याचाराच्या आणि वोटचोरी करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि.१२) काँग्रेस भवन येथे जोरदार निदर्शने केली.

सोमवारी दुपारी पाच वाजता भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी महिला सन्मान पर राहुल गांधी, सोनिया गांधी चुप्पी तोडो, जवाब दो, अशा घोषणा देत काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करुन निषेध व्‍यक्‍त करण्यात आला आहे. ​निषेध आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

लोकशाही टिकलीच पाहिजे, संविधान बदलू देणार नाही, अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. राहुल गांधी तुम आगे बढो, हम आपके साथ है, अशी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. यावेळी भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपडंला, केशव इंगळे, संजय गायकवाड, देवा गायकवाड, सुशिला आबोटे, संगमित्रा चौधरी, शोभा बोंबे, भारती हिपलपल्‍ली आदी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT