CNG  Pudhari
सोलापूर

Solapur CNG shortage: सोलापुरात दररोज 30 मेट्रीक टन सीएनजीचा तुटवडा

गरज रोज 100 ते 120 मे.टनाची, गुजरातच्या दाभोळमधून येते कच्चे इंधन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सध्या सोलापूर शहर जिल्ह्यासाठी दररोज 100 ते 120 मेट्रीक टन सीएनजी इंधन वाहनांसाठी लागत आहे. परंतु सोलापुरातील औद्योगिक वसाहतीमध्ये केवळ 70 मेट्रीक टन क्षमतेचेच सीएनजी उत्पादन होत आहे. त्याबाबत बैठक घेतली असून, येत्या पंधरा दिवसांत प्रति दिन उत्पादन क्षमता ही 95 टन मेट्रीक टनपर्यंत नेले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

वाहनांसाठी लागणारे सीएनजी इंधन हे एलएनजी रुपात आणले जाते. गुजरातमधील दाभोळ येथून हे एलएनजी सोलापुरात औद्योगिक वसाहतीमध्ये आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन सीएनजी तयार केले जाते. सध्या 600 मेट्रीक टन एलएनजी उपलब्ध आहे. उत्पादनक्षमता वाढल्यानंतर सीएनजी पुरवठा सुरक्षित होईल, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

सोलापूर शहर-जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा नाही. लोकांनी पॅनिक होऊन डिझेलचा साठा करु नये, तसेच इंधन पंपावर ड्रममधून शेतकऱ्यांना इंधन नेल्यास त्यांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या नोंदीनुसार रँडम्ली त्या शेतकऱ्यांनी खरोखरच शेती कामांसाठी नेले आहेत की काळा बाजारात विक्री करत आहेत, याची माहितीही तपासली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. या कामांसाठी लागणाऱ्या जेसीबी, ट्रँकर यासारख्या वाहनांना इंधन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. शेतीकामांसाठी आणि नागरिकांसाठी इंधन कमी पडू देणार नसल्याचेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT