Solapur railway: स्वच्छ गाड्या, आनंदी प्रवासी पंधरवडा साजरा File Photo
सोलापूर

Solapur railway: स्वच्छ गाड्या, आनंदी प्रवासी पंधरवडा साजरा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने राबवला उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयाच्या प्रशासनाने 5 व 6 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ रेलगाडी (स्वच्छ ट्रेन) या थीम अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याचा भाग म्हणून गाड्या व देखभाल डेपोमध्ये स्वच्छतेसह आरोग्य मानके सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले.

विविध ठिकाणी वरिष्ठ विभाग अभियंते (एसएसई) आणि मुख्य आरोग्य निरीक्षक (सीएचआय) यांनी गाड्यांची कसून तपासणी केली. गाड्यांमध्ये हे समाविष्ट होते: ॉन-बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस (ओबीएचएस) चे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी, स्वच्छता आणि देखभाल साहित्याची उपलब्धता देखील तपासण्यात आली. सेवेदर्जा सुधारण्यासाठी व प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले. शिवाय, डब्यांची स्वच्छता व कचरा टाकण्याविषयीचे सुचना पत्रकाची तपासणीही केली. जागरूकतेसाठी पोस्टर्स लावले.

सोमवार रेजी पिट लाईनची सखोल स्वच्छता करण्यात आले. येथेे आधुनिक उपकरणे व यांत्रिक साधनांचा वापर करून ट्रेन पीट लाइनची स्वच्छता करण्यात आली. सिद्धेश्वर एक्सप्रेस, हसन एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस व वंदे भारत एक्सप्रेस या सर्व डब्यांमध्ये स्वच्छता जागरूकता पोस्टर्सची उपलब्धता निश्चित केली. रेक गाड्यांची पुन्हा एकदा कसून तपासणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT