जिल्ह्यात पुरवठा विभागाची मिशन सुधार योजना Pudhari File Photo
सोलापूर

Solapur News : जिल्ह्यात पुरवठा विभागाची मिशन सुधार योजना

७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील बोगस व अपात्र लाभार्थी शोधून ते कमी करण्यासाठी पुरवठा विभागाच्यावतीने मिशन सुधार योजना सुरू असून, यात जिल्ह्यातील ७१ हजार ९५६ संशयास्पद व अपात्र लाभार्थी रेशन यादीतून वगळण्यात आले आहेत.

आधार डेटाबेस, ई-केवायसी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने ११ तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची माहिती तपासली. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले, प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक, कंपनी किंवा विविध मंडळांचे संचालक, तसेच मयत, दुबार नोंदणी झालेले आणि दीर्घकाळ धान्य न उचलणारे लाभार्थी या तपासणीत आढळून आले.

माळशिरस येथे सर्वाधिक १० हजार ८७७, माढा १० हजार १५३, बार्शी ९ हजार १६, पंढरपूर ८ हजार १८०, अक्कलकोट ६ हजार १८७, सांगोला ६ हजार ३३ आणि दक्षिण सोलापूरमध्ये ५ हजार ८५८ संशयास्पद लाभार्थी आढळले. करमाळा व मंगळवेढा प्रत्येकी ४ हजार ७९४, मोहोळ ३ हजार ५९३, तर उत्तर सोलापूरमध्ये १ हजार ९२२ लाभार्थींचा समावेश आहे.

वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले ४१ हजार ३१२, दीर्घकाळ धान्य न उचलणारे १३ हजार ९२६, बोगस ५ हजार ४, आधार स्टेटसमध्ये त्रुटी असलेले ३ हजार ९८०, कंपनी संचालक ३ हजार ९७ आणि मोठी वार्षिक उलाढाल असलेले २ हजार ८९१ लाभार्थी आहेत. याशिवाय १०० वर्षांहून अधिक वयाचे १ हजार ७६ आणि चारचाकी वाहनधारक ४७३ लाभार्थीही आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT