सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांसाठी 450 हून अधिक प्रकारची औषधे खरेदी केली जातात. यासाठी तब्बल पाच कोटी 31 लाख रुपये खर्च होतात. स्थानिकस्तरावर दोन कोटीची तर अन्य रकमेतून शासन नियुक्त कंपन्याकडूनही औषधे पुरवली जातात. यात अनेक महागड्या औषधांचाही समावेश आहे.
येथील बाह्य व आंतरुग्णायात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना मोफत औषधे दिली जाते. थंडी ताप असो वा अन्य मोठे आजार. तसेच लहान शस्त्रक्रियांसह जटिल व किचकट शस्त्रक्रियाही अनेक वेळा सिव्हीलमध्ये होतात. यासाठी, महागड्या औषधांची गरज पडते. काही रुग्ण हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पात्र ठरतात, तर, बरेच रुग्ण यासाठी अपात्र ठरतात.
सिव्हिलमध्ये शहर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतातच. पण, याशिवाय कर्नाटकातील विजयपुरा, कलबुर्गी, बिदर यासह तेलंगणा व आंध्र प्रदेशातील रुग्णांची संख्याही अधिक असते. साधारणतः दर दिवशी 1300 रुग्ण उपचारासाठी येतात. अपघातातील जखमींवर किचकट शस्त्रक्रिया केली तर अशा रुग्णांचा सिव्हीलमधील मुक्काम वाढतो. शिवाय, सर्पदंश झालेल्या रुग्णाची स्थिती सुधारेपर्यंत त्यांना सिव्हीलमध्येच ठेवले जाते.
वर्षभरात लहान मोठ्या मिळून तब्बल 23 हजार 863 शस्त्रक्रिया सिव्हिलमध्ये होतात. साधारणपणे सिव्हीलमध्येे दरदिवशी 65 हून अधिक विविध शस्त्रक्रिया केली करण्यात येतात. यासाठी 450 प्रकारच्या औषधांची खरेदी करावी. काहीवेळा औषधांच्या संख्येत वाढही होत असते.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. शासनाकडून मिळत असलेल्या अनुदानित रकमेतून जास्तीत जास्त औषधांचा रुग्णांना उपयोग होईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.- डॉ. ऋत्विक जयकर, प्रभारी अधिष्ठाता, सिव्हिल हॉस्पिटल