voter list  pudhari photo
सोलापूर

Solapur News: ‘शहर मध्य’मध्ये सर्वाधिक अपात्र

शहराऐवजी अनेकांनी मूळगावी ठेवले मतदार यादीत नाव

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मतदारांच्या नावाची डिजिटायझेशनची शेवटची तारीख ही १७ ऑगस्ट होती. यात शहर मध्यचे आ.देवेंद्र कोठे, शहर उत्तरचे आ.सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदार संघातील सर्वाधिक मतदार अपात्र ठरले आहेत. तर, अनेकांनी शहरातील नावे कमी करून मूळ गावी नावे जोडली आहेत.

जिल्ह्यातील ११ ही विधानसभा मतदार संघातील ३९ लाख ४१ हजार ९५ मतदार असून, यातील ३३ लाख २४ हजार २१५ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तर ६ लाख १६ हजार ८८० मतदार अपात्र ठरले आहेत. यात बेपत्ता, मृत, स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे.

सोलापूर शहर मध्य मतदार संघात एकूण ३ लाख ५२ हजार ६८१ मतदार असून यातील १ लाख १५ हजार ८३७ मतदार अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक अपात्र मतदार संख्याही याच मतदार संघातून झाले आहेत. त्या पाठोपाठ सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून एकूण ३ लाख ३५ हजार १७८ मतदार असून, यातील ६९ हजार ४८४ मतदार अपात्र ठरले आहेत.

अक्कलकोट मतदार संघात एकूण ३ लाख ९५ हजार ८६० मतदार असून यातील ६५ हजार ५८७ मतदार अपात्र ठरले आहेत. पंढरपूर मतदार संघात एकूण ३ लाख ७८ हजार ७१८ मतदार असून, यातील ६१ हजार ९९८ मतदार अपात्र ठरले आहेत. दक्षिण सोलापूर मतदार संघात एकूण ३ लाख ९७ हजार ८२८ मतदार असून, यातील ६० हजार ५३ मतदार अपात्र ठरले आहेत. तसेच बार्शीतून ४९ हजार २५२, करमाळा मतदार संघातून ४८ हजार ४२ मतदार, माढा मतदार संघातून ३७ हजार ४००, सांगोला मतदार संघातून ३४ हजार २९७ मतदार, मोहोळ मतदार संघातून ३७ हजार २८२ मतदार, माळशिरस मतदार संघातून ३७ हजार ६६८ मतदारांची नावे अपात्र ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT