Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Municipal Corporation : अखेर नगर अभियंत्यासह १८ जणांवर दोषारोप निश्चित

महापालिका आयुक्तांकडे अहवाल सादर; मक्तेदारास दिली तब्बल ८१ लाखांची जास्त बिले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नालेसफाई कामामध्ये गैरप्रकार झाल्याचे मान्य करत याप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने नगर अभियंत्यासह १८ जणांवर ठपका ठेवला. याप्रकरणी नगरसेवक अनंत जाधव यांनी मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली होती.

एक्सॅवेटर लाँग बुम म्हणजे पोकलेनचा दर एक तासासाठी ४ हजार ५०० रुपये ठरविण्यात आला. त्याच दराने आठ तासांसाठी ३६ हजार रुपये दर अपेक्षित होता, तरीही ४८ हजार रुपये म्हणजेच ३३.३३ टक्के वाढीव दरास तांत्रिक मान्यता देण्यात आली. यामुळे तब्बल ८१ लाख ३६ हजार ४२८ या अधिकच्या रकमेची बिले मक्तेदारास देण्यात आल्याचे पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

तांत्रिक मंजुरी योग्य प्रकारे असतानाही ४०.२० टक्के वाढीव दरास मान्यता देण्यात आली. नगर अभियंता विभागाने शहर सुधारणा विभागाशी समन्वय न साधणे, ई- फाईल न पाठविणे हे चुकीचे असल्याचे अहवालात नमूद आहे. नगर अभियंता सारिका आकुलवार यांनी ११ बिले रिव्हाईज केली. या बिलांवर त्यांनी नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. त्यातून महापालिकेचे ८१ लाख ३६ हजार ४२८ रुपये अधिकचे मक्तेदारास गेल्याचे स्वतः नगर अभियंंता आकुलवार यांनी चौकशी समितीपुढे मान्य केल्याचे अहवालात म्हटले आहे.

नाले सफाईची सर्व बिले ही पुन्हा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नियंत्रणाखाली सुधारित करून घ्यावीत. त्यानंतरच ती बिले मक्तेदारास देण्यात यावीत. याप्रकरणी दोषींनी सात दिवसांत खुलासा द्यावा.
- डॉ. सचिन ओंबासे, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT