सोलापूर : एप्रिल आणि मे असे दोन महिन्यात येथील विभागीय जात पडताळणी समिती या कार्यालयाकडून दोन हजार 852 जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित प्रस्तावकाच्या मेलद्वारे त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित केले असून या काळात पडताळणीसाठी दाखल केलेली अपूर्ण प्रस्तावाची संख्या ही तीन हजार 648 असून ती प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांविषयी संबंधित प्रस्तावकांना मेलद्वारे यातील त्रुटीही कळवली असून संबंधितांकडून त्याची पूर्तता केल्यास त्यांचेही दाखल्याचे निपटारा करून वितरीत केली जाईल.
अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेले शहर-जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्ग या आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी आवश्यक आहे. पडताळणी प्रमाणपत्र असेल तरच यांना आरक्षित प्रवर्गातून प्रवेश मिळतो. जात पडताळणी नसेल तर या विद्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गाऐवजी खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागतो. यामुळे यांना शैक्षणिक सवलत मिळत नाही.
म्हणूनच, विद्यार्थी व पालक पडताळणी प्रमाणपत्रासाठी धावपळ करतात. जात पडताळणी करून घेण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावकांपैकी दोन हजार 852 जात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केले असून संबंधित प्रस्तावकाच्या मेलद्वारे ती वितरित केली आहे. तसेच तीन हजार 648 अपूर्ण प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांतील त्रुटीविषयी संबंधित प्रस्तावना मेलद्वारे कळवले असून त्याची पूर्तता केल्यानंतर त्याही दाखल्याचे वितरण करण्यात येणार आहे.
वेळेत जात पडताळणी होऊन मिळावे, यासाठी संबंधित प्रस्तावकांनी प्रस्ताव सादर करताना त्याची तपासणी करावी. त्यातील महत्त्वाचे सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावे. यामुळे प्रस्तावकांना वेळेत दाखले मिळू शकतात. अन्यथा वेळ लागू शकतो. मग शैक्षणिक अभ्यासक्रम घेताना अडचण येते, ती येऊ नये यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.