कुर्डूवाडी : जेऊर (ता.करमाळा) येथील आमदार नारायण पाटील यांच्या तालमीतील पैलवान कुस्तीसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव येथे जात असताना त्यांचा पिकअप उलटला. या घटनेत 33 पैलवान जखमी झाले. सदरची घटना निमगाव-पिंपळनेर रस्त्यावरील मिसाळ वस्तीजवळ घडली.
निमगाव टे येथे ग्रामदैवत हनुमानाची यात्रा असते. यात्रेनिमित्त कुस्त्यांच फडाचे आयोजन केले होते. यासाठी जेऊर येथून हे पैलवान पिकपने येत होते. परंतु पिकपचा रॉड तुटल्याने पिकअप उलटला. यामध्ये एकमेकांच्या अंगावर पडून हे पैलवान जखमी झाले. सर्व जखमी पैलवानांना कुर्डूवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर असलेल्या एकास अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.