सोलापूर

Solapur News : केडर निवडणुकीत राऊत, पाटील, परिचारक बिनविरोध

१६ जागांसाठी १०२ जणांचे १०९ अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा देखरेख सहकारी संस्‍था (केडर) निवडणुकीत बार्शीतून रणवीर राऊत, मोहोळमधून मदन पाटील आणि पंढरपूर येथून प्रणव परिचारक यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्‍याने त्‍या जागा बिनविरोध झाल्‍याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हा उपनिबंधक मुकूंद पवार यांनी दिली.

केडरच्या १६ जागांसाठी १०२ जणांनी १०९ अर्ज दाखल केले. यामध्ये दिग्गज नेत्‍यांसह त्‍यांची मुले, पुतण्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अर्जांची शुक्रवारी (दि. २०) छाननी होणार आहे. मंगळवेढ्यांची जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यांनी दाखल केले अर्ज

खा. धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. जयवंतराव जगताप, माजी आ. दिलीप माने, सिद्धाराम चाकोते, सुरेश हसापुरे, रणजितसिंह शिंदे, बबनराव आवताडे, शंभूराजे जगताप, सुभाष गुळवे, शिवानंद पाटील, मिलन कल्‍याणशेट्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT