Rajmata Jijau Bus 
सोलापूर

Solapur: बसस्थानकात २० राजमाता जिजाऊ बसेस येणार

एसटीचा ताफा बळकट; १० दिवसांत या विभागात ३५ बसेस प्रवासी सेवेत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रवाशांना आरामदायी व जलद प्रवास देण्यासाठी परिवहन महामंडळाकडून शासनाच्या बस खरेदी धोरणानुसार येथील मध्यवर्ती बसस्थानकात येत्या सात ते आठ दिवसात राजमाता जिजाऊ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या २० बसेस दाखल होणार असून या विभागातील ३५ राजमाता जिजाऊ बसेस शहर-जिल्ह्यातील विविध रस्त्यावरून धावतील.

यामुळे, एसटीच्या प्रवाशांना या अत्याधुनिक बसेसमधून आरामदायी प्रवास करता येणार आहे. सध्या, पहिल्या टप्प्यात मंगळवेढा, अक्कलकोट व सांगोला या बसस्थानकाकडे १५ बसेस दाखल झालेल्या आहेत व येणाऱ्या काही दिवसात मध्यवर्ती बसस्थानकात २० राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेले बसेस दाखल होतील.

वाढती गर्दी व काल बाहेर झालेल्या जुन्या गाड्यांची स्थिती लक्षात घेऊन महामंडळाने ३ हजार ३x२ आसन रचनेच्या व ९ हजार साध्या व २०० मिनी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून सोलापूरच्या विभागाला ३५ बस मिळत आहेत.

राजमाता जिजाऊच्या २० नव्या बसेसमुळे केवळ प्रवासी संख्या वाढणार नाही तर महामंडळाच्या बसवरील लोकांचा विश्वास वाढेल. आम्ही सर्व आगारांना न्याय मिळेल, याची काळजी घेऊ. पुढील टप्प्यात आणखी बसेसची मागणी केली आहे.
अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT