Fraud Case 
सोलापूर

Wedding Fraud : सोने, रोकड घेऊन नववधू पसार; सहाजणांविरुद्ध गुन्हा

पती बहिणीला पंढरपूरला सोडण्यासाठी घराबाहेर जाताच घरातील एक लाख रुपये रोख आणि दीड तोळे सोने घेऊन नववधू पसार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पती बहिणीला पंढरपूरला सोडण्यासाठी घराबाहेर जाताच घरातील एक लाख रुपये रोख आणि दीड तोळे सोने घेऊन नववधू पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी ज्योती लोंढे, सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनीता दाभाडे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार लग्‍नासाठी आधीच २ लाख १७ हजार ५०० रुपये घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सूरज संजय पवार (रा. गुरुदत्त नगर, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पुणे, सोलापूर आणि आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. ज्योती लोंढे, सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनीता दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे या सहा जणांनी संगनमत करून योगिता हिच्याशी लग्‍न लावून देण्याच्या नावाखाली वेळोवेळी फी घेतल्याचा आरोप आहे. पोलिस उपनिरीक्षक काजळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT