सोलापूर

Solapur Blackbuck Meat Sale: काळविटाची मांस विक्री करणारे तिघे जेरबंद

वनविभागाची माढ्यात कारवाई, घरात सापडले काळविटाचे मांस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बुद्रुकवाडी (ता. माढा) येथे संरक्षित वन्य प्राणी असलेल्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार वनविभागाने उघडकीस आणला.

शुक्रवार (दि. ११) रोजी बुद्रुकवाडी गावात वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांच्या पथकाने लखन बबन काळे, त्याचा भाऊ विनोद बबन काळे यांच्या घरावर छापा टाकला. झडतीत वन्यप्राण्याचे मांस आढळून आले. त्याच वेळी मांस खरेदीसाठी आलेला ज्योतीराम आत्माराम नागटिळक हा जागेवरच पकडला गेला. तिघांनाही ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंह व सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ए. डी. गायकवाड, वनरक्षक बी. डी. पटेकर, सी. एस. शिवशरण, ए. डी. राठोड, एस. आय. सय्यद यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT