सोलापूर : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे यांना नरेंद्र मोदी विचार मंच भारत अंगीकृत राष्ट्रीय शिक्षक मंचच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
याबाबतचे पत्र नरेंद्र मोदी विचारमंचचे राष्ट्रीय महासंघटन मंत्री सुनील घोडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष अनिरुद्ध मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. राष्ट्रीय शिक्षक मंचचे दहा हजार पेक्षा जास्त पदवीधर मतदार आहेत. सहा हजार पेक्षा जास्त शिक्षक मतदार आहेत.
राष्ट्रीय शिक्षक मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. युवराज भोसले व सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय तळेकर यांचे हस्ते पाठिंब्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, विधान परिषद निरीक्षक तथा धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील, सोलापूर जिल्ह्याचे भाजपाचे उपाध्यक्ष रमेश माने , मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे, प्राचार्य श्रीधर उन्हाळे यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय शिक्षक मंचचे राज्यसल्लागार बलभीम हांडे, उपाध्यक्ष गुरुनाथ माने, प्राचार्य बाळासाहेब गुंड, मनोजकुमार खडके, मोहोळ तालुका अध्यक्ष पंकज गुंड, सचिव विदुर शेळके आदी उपस्थित होते.