Solapur Theft | दुचाकीवरून येऊन सव्वा लाखाचे मंगळसूत्र चोरले  Pudhari File Photo
सोलापूर

Solapur Theft | दुचाकीवरून येऊन सव्वा लाखाचे मंगळसूत्र चोरले

रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूूर : येथील रेल्वे स्टेशनच्या रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी चोरून नेले. याप्रकरणी मीरा उबाळे (रा. विद्यारण्यपुरा जि. बेंगलोर) यांनी सदर बझार पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली आहे.

स्टेशनजवळ मीरा उबाळे उभ्या असताना तेथे दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून आले व त्यांच्या पाठीमागे थांबले. त्यांनी उबाळे यांच्या गळ्यातील दोन वाटी, प्लेन खडा, दोन मोती आणि दोन गुंड अशा वर्णनाच्या सव्वालाख रुपये किमतीचे सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी करून पळून गेले. ही घटना गेल्या रविवार रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली, सदर बझार पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT