theft Pudhari
सोलापूर

Solapur Theft: भोसरेमध्ये घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

भर दिवसा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले

पुढारी वृत्तसेवा

कुर्डुवाडी : भर दिवसा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना सकाळी 7 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान जिजाऊनगर भोसरे (ता. माढा) येथे घडली.

नागनाथ बारंगळे (74, रा. जिजाऊ नगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. नागनाथ बारंगळे हे पत्नीसह सकाळी 7 वाजता घराला कुलूप लावून आळंदी येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते. रात्री 8 वाजता ते कुर्डुवाडीत पोचले. त्यादरम्यान चोरट्याने घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरातील सामान अस्ताव्यस्त करुन चोरी केली. यामध्ये दीड तोळा वजनाचे 75 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स व साखळ्या, 10 हजार रुपये किमतीच्या अर्धा ग्रॅमच्या चार अंगठ्या, 1 ग्रॅम वजनाचे 5 हजार रुपयांचे सोन्याचे बदाम, पैंजण, करदोडे, जोडवी असे 10 हजार रुपयांचे चांदीचे दागिने व रोख 20 हजार रुपये असे एकूण 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT