भोंदू मनोहर भोसले 
सोलापूर

Manohar Bhosale : भोंदूबाबा मनोहरवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा

आठ लाख ६१ हजारांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुलीच्या विवाहाबाबत माहिती मिळवून देण्याचे, पत्नीच्या आरोग्याच्या समस्येवर धार्मिक विधी करून उपाय करण्याचे आमिष दाखवत बांधकाम व्यावसायिकाची ८ लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा मनोहरमामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल जयसिंग मस्‍के (वय ५०, रा. मांजरी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीच्या विवाहाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ते मनोहर मामाकडे गेले होते. त्यावेळी मनोहरमामाने विशाल वाघमारे याच्यामार्फत फिर्यादीकडून पाच हजार रुपये घेतले. त्यावेळी मुलीचे लग्न होईल आणि त्‍यांची पत्नी उपसरपंच होईल, असे त्‍यांना सांगितले. पाच अमावस्‍येला पूजा करावी लागले असे सांगून त्‍यांच्‍याकडून एक लाख रुपये घेतले. त्‍यानंतर मनोहर मामाच्‍या मुलांच्या शिक्षणासाठी मांजरी परिसरातील साई बालाजी बिल्डिंगमधील मस्‍के यांचे दोन फ्लॅट भाड्याने घेतले.

या दोन्‍ही फ्‍लॅटचे ६३ महिन्यांचे भाडे व डिपॉझिटची रक्कम दिली नाही. मस्‍के यांची एकूण ८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक यामधून केली. याप्रकरणी मनोहर मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरोधात करमाळा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वळसे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT