सोलापूर

Bhima River : पावसाळ्याच्या अखेरीस भीमा नदीचे पात्र पडले कोरडे

ऑक्टोबर हिटमुळे पिके होरपळू लागली; उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भोसे (क.) : पावसाळा कोरडा गेला. त्यातच ऑक्टोबर हिटमधील उन्हाच्या तीव्र झळांनी कशीबशी जपलेली पिके होरपळून निघत आहेत. त्यातच भीमा नदीचे पात्रही कोरडे पडले आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळांनी परिसर भाजून निघत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही अवस्था कायम राहत आहे. तापमानाच्‍या पाऱ्यानेही ३४ ते ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे पिकांच्या पाण्याची भूकही मोठ्या प्रमाणात वाढली असून कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी खालावली आहे.

परिणामी पिकांना पाणी कमी पडून पिकेही होरपळू लागली आहेत. यंदाच्या मोसमातील पावसाळा संपला आहे. भीमा नदीवरील गुरसाळे तसेच पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दारे अद्याप बसवण्यात आलेली नाहीत. हे दरवाजे बसवून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यास या पिकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भीमा विकास धरणातून भीमा नदीत लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी प्रयत्‍न करावेत, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील देवडे, शेळवे, खेडभोसे, खेडभाळवणी येथील भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. होळे-कौठाळी भागात नदीपात्रात थोडेफार पाणी आहे. खड्‌ड्यात साठलेले पाणी जेमतेम दोन-तीन दिवसातच संपणार आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडावे.
- पूनम पवार, पंचायत समिती सदस्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT