hanging case Pudhari News Network
सोलापूर

Solapur News: भारतरत्न इंदिरा नगरात तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

अज्ञात कारणावरून आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील भारतरत्न इंदिरा नगर भागात एका ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरासमोर गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

विश्वनाथ शरप्पा भांडेकर (वय ३३, रा. २५४, भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. विश्वनाथने अज्ञात कारणावरून आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

हा प्रकार कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी सोलापूर शासकीय सिव्‍हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची नोंद सिव्‍हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून तरुणाने आत्महत्या का केली, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT