Solapur Crime Pudhari
सोलापूर

Solapur Crime : बार्शीत कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांवर गुन्हा

बार्शी कुर्डूवाडी बाह्यवळण रोडवरील नागोबाचीवाडी शिवारात असलेल्या डिलक्स स्पा सेंटरवर छापा

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : बार्शी कुर्डूवाडी बाह्यवळण रोडवरील नागोबाचीवाडी शिवारात असलेल्या डिलक्स स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत मिझोराम राज्यातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. स्पा सेंटरचा मॅनेजर बाबाभाई खाजाबाई चौधरी (वय ३०, रा. नंदनवन अपार्टमेंट, कतारगाम, सुरत, गुजरात), व स्पा सेंटरचा मालक आकाश काशीद (रा. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी पोहेकॉ सूर्यकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री ११.१० वाजता डिलक्स स्पावर छापा टाकण्यात आला. चौधरी व काशीद हे संगनमत करून स्पा सेंटरचा कुंटणखाना म्हणून वापर करून दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केलेे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही पीडित महिला (वय २५ व ४५) या मूळच्या मिझोराम राज्यातील आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव चव्हाण, नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण हे करत आहेत. गेल्या काही महिन्यांत कुटणखान्यावर अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. तरीही पुन्हा कुंटणखाने कसे सुरू राहतात, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT