सोलापूर

Bangladeshi Citizen Arrest : सोलापुरात बांगला देशीला अटक; कागदपत्रे जप्त

न्यायालयाने संशयितास सुनावली पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कोंडा नगर परिसरात बांगला देशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. हसन रोशन खान (वय ३३, रा. नॅशनल पब्लिक शाळा, शेट्टी कॉलेज जवळ, शाबाद रोड, एशियन गॅसच्या पुढे, मूळ - बांगला देश) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने संशयितास पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना संबंधित व्यक्तीच्या हालचालींबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी चौकशी केली असता तो मूळचा बांगला देशचा असून त्याच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक परवानगी आणि कागदपत्रे, संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी नसल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी त्याच्याकडून आधारकार्ड, वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र, दुचाकीचे आरसी बुक, मोबाईल कार्ड, बँकेची एटीएम कार्डे आणि व्हिसा कार्ड अशी कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार सुरेंद्र दत्ता काळे यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT