Drought Pudhari
सोलापूर

Solapur Drought : सोलापूरचे सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त यादीत

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व ११ तालुक्यांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला. आता शेती पिकांचे पंचनामे सुरू होणार आहेत. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व ११ तालुक्यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शनिवारी घेतला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील मोठी तूट आणि इतर दुष्काळी निकषांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अर्थात प्रथम कळ लागू झाली.

खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे दुष्काळी परिस्थिती असल्याचे समोर आली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्य:स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार तातडीने खरीप पिकांचे पंचनामे सुरू करण्यात येत आहेत. दुष्काळाने पिकांचे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. यापूर्वी जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे.
- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT