Sugar Factory file photo
सोलापूर

Solapur News: ‘गोकूळ’कडील बिलासाठी शेतकरी पुन्‍हा मैदानात

सोमवारी जिल्‍हाधिकाऱ्यांची भेट घेणार : आंदोलन करण्याचा दिला इशारा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अक्‍कलकोट तालुक्‍यात धोत्री येथील गोकूळ कारखान्‍यांकडील सन २०२५-२६ मधील थकीत ऊस बिल मिळाल्‍यानंतर शेतकरी आता सन २०२३-२४ आणि २०२४-२५ वर्षातील थकीत बिलासाठी आंदोलन करणार आहे. त्‍याआधी येत्‍या सोमवारी (दि. ३) जिल्‍हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्‍ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गोकूळ साखर कारखान्‍याला ऊस घातला आहे. मात्र, त्‍या शेतकऱ्यांची बिले अद्यापही कारखानदारांनी दिली नाहीत. त्‍यातच कारखाना ओंकार ग्रुपला विक्री करण्यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. त्‍यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, बिले देण्याची मागणी करत आहेत.

धाराशिव, सोलापूर जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर अठरा दिवस आंदोलन केल्‍यानंतर त्‍यांना सन २०२५-२६ या वर्षातील थकीत बिले मिळाली आहेत. मात्र, सन २०२३-२४ आणि २०२४-२०२५ मधील बिले अद्यापही शेतकऱ्यांना मिळालीनसल्यानेेपुन्‍हा आंदोलनाच्‍या तयारीत आहेत.

धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्‍ह्यातील एक हजारांपेक्षा जास्‍त शेतकऱ्यांची बिले गोकूळ साखर कारखान्‍यांकडे जुनी बिले थकली आहेत. या बिलासाठी सोमवारी जिल्‍हाधिकारी यांची भेट घेणार आहे. बिले न मिळाल्‍यास पुन्‍हा आंदोलन सुरू करणार आहे.
- ॲड. अमोल पाटील, शेतकरी आंदोलन नेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT