Solapur-Ajmer train Pudhari Photo
सोलापूर

Solapur Ajmer train: सोलापूर-अजमेर गाडीला जेऊरमध्ये थांबा द्यावा

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

रकरमाळा : नवी दिल्ली येथे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सोलापूर-अजमेर या विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडीला जेऊर (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी केली.

खासदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, जेऊर रेल्वे स्थानक करमाळा, जामखेड, परांडा तसेच कर्जत-राशिन परिसरासाठी अत्यंत सोयीचे असून या भागातील नागरिकांच्या प्रवासासाठी ते महत्त्वाचे केंद्र आहे. या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी असून अजमेर येथील प्रसिद्ध दरगाह शरीफ येथे दर्शनासाठी अनेक भाविक नियमितपणे प्रवास करतात..

जेऊरपासून सुमारे 30 किमी अंतरावर आवाटी येथे अलहज वली चाँदपाशा वली यांची प्रसिद्ध दरगाह असून देशभरातून हजारो भाविक येथे येत असतात. याशिवाय सूरत येथील मोठ्या होलसेल कापड बाजारामुळे व्यापारी वर्गाचीही मोठी ये-जा सुरू असते. राजस्थानमधील कामगार तसेच पर्यटनासाठी जयपूरसह विविध ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. सोलापूर विभागातून अजमेरसाठी ही एकमेव थेट रेल्वेगाडी उपलब्ध असल्याने या गाडीला थांबा द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT