सोलापूर

Solapur : चुकीच्या परमिटमुळे कर्नाटक बसेसवर कारवाई

बसमधील प्रवाशांची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

अक्कलकोट : कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये प्रवाशी वाहतूक करणाऱ्या कर्नाटकच्या बसेसची परमिटची तपासणी करून चुकीचे परमिट असलेल्या पाच बसेसवर अक्कलकोट आगाराच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यामूळे बसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली.

कर्नाटकातील कलबुर्गी, जेऊर्गी, आळंद व अफजलपूर आगाराच्या बसेस मोठ्या प्रमाणात अक्कलकोट तालुक्यातून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये प्रवासी वाहतूक करतात. काही बसेसचे परमिट एका मार्गाचे असते मात्र त्या दुसऱ्या मार्गाहून प्रवासी वाहतूक करत असतात. त्यांच्या चुकीमुळे प्रवाशांनाही एखादी घटना घडल्यास त्रास होऊ शकतो.

यामुळे अक्कलकोट आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक सत्यजित खताळ यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवार सकाळी दहा वाजल्यापासून येणाऱ्या सर्व कर्नाटकाच्या बसेसना अडवून त्यांची परमिटची पाहणी केली. योग्य परमिट आढळून आल्यावर त्या बसेस मार्गस्थ करण्यात आल्या. ज्या बसेसचे परमिट चुकीचे आहे अशा बसेस ताब्यात घेऊन आगारात लावण्यात आल्या . अचानक बसेस थांबल्याने बसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

चुकीचे परमिट असलेल्या कर्नाटकच्या पाच बसेस ताब्यात घेण्यात आल्या होत्या. याबाबत वरिष्ठस्तरावर माहिती दिली. सुमारे तीन तासाने समज देऊन सर्व बसेस पुन्हा सोडून देण्यात आल्या.
- सत्यशील खताळ, आगार व्यवस्थापक अक्कलकोट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT