Accident Pudhari
सोलापूर

Solapur Accident : चारचाकी वाहनाच्‍या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्‍यू

सोलापूर-मंगळवेढा रोडवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : चारचाकी वाहनाच्‍या धडकेत दुचाकीवरील अनोळखी इसमाचा मृत्‍यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२९) दुपारी बीएमआयटी कॉलेजसमोर घडली. ५० वर्षीय अनोळखी इसम दुचाकीवरुन सोलापूर-मंगळवेढा रोडवरुन जात असताना बीएमआयटी कॉलेजसमोर चारचाकी वाहनाने त्‍याच्‍या दुचाकीस धडक दिली.

यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्‍याला ताबडतोब ॲम्‍ब्‍युलन्‍सने उपचारासाठी सोलापूरच्‍या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्‍हिल पोलिस चौकीत झाली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT