Accident Pudhari
सोलापूर

Solapur Accident: ट्रकला ओव्हरटेक करताना दोघांचा मृत्यू

जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जुना बोरामणी नाका येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकखाली सापडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 27) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला. यात एकाच्या अंगावरून ट्रक गेला, तर दुसरा ट्रकसोबत फरफटत गेला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. सैफन शेखफरीद पटेल (वय 40) व हुजूर अल्लाउद्दीन पटेल (वय 36, दोघे रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. ट्रकचालक सलीम इस्माईल भैरमगडी (वय 35, रा. आळंद, गुलबर्गा, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. जेलरोड पोलिस ठाण्यात शकुर अल्लाउद्दीन पटेल (रा. बोरामणी) यांनी फिर्याद दिली.

सैफन पटेल व हुजूर पटेल हे आचारी होते. ते दुचाकीवरून (एमएच 13 बीटी 5822) जात असताना जुना बोरामणी नाका चौकात मागून आलेल्या ट्रकला (एमएच 04 जेसी 2910) ओव्हरटेक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी चालकाला दुचाकी दिसली नाही. त्याचवेळी दुचाकी थेट ट्रकच्या मार्गात आली आणि ट्रकखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर बोरामणी परिसरात शोककळा पसरली.

दोघांच्या नातेवाईकांनी तसेच गावकऱ्यांनी शासकीय रुग्णलयात धाव घेतली. सैफन पटेल यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, आई असा परिवार आहे. हुजूर पटेल यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT