सोलापूर : विरुद्ध दिशेने डिव्हायडर ओलांडून आलेल्या भरधाव टेम्पोने ओम्नी व्हॅनला धडक दिल्याने दोघेजण ठार झाले. मंगळवारी (दि.22) दुपारी पावणेतीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामागार्वर कोंडी येथील गणेश पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला.
ओम्नी व्हॅन मोहोळहून सोलापूरला निघाली होती. गणेश पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर टेम्पोने त्यास जोरदार धडक दिली. ओम्नी व्हॅनमध्ये हॉटेल व्यावसायिक रवींद्र सुभाष वाघमोडे (वय 52, रा. कोळेगाव, ता. मोहोळ) आणि अनिल दत्तात्रय वाघचवरे (34, रा. भांबेवाडी, ता. मोहोळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.