Accident file photo
सोलापूर

Solapur Accident: टेम्‍पोच्‍या धडकेत टमटमचालक ठार

सोलापूर हैदराबाद रोडवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आशयर टेम्‍पोच्‍या धडकेत टमटम चालक ठार झाल्याची घटना सोलापूर हैदराबाद रोडवरील दोड्डी फाट्याजवळ घडली. हारुन बाबुलाल बागवान (वय ५२, रा. सग्गम नगर, सोलापूर) असे मयत व्‍यक्‍तीचे नाव आहे.

हारुन बागवान हे केळी तसेच फळांचा व्‍यापार करतात. बुधवारी (दि.९) सकाळी ते टमटममधून माल घेऊन बोरामणीकडे जात होते. सकाळी साडेसातच्‍या सुमारास दोड्डी फाट्याजवळील पेट्रोलपंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्‍पोने त्‍यांच्‍या टमटमला धडक दिली.

त्‍यात टमटम पलटी होऊन रस्‍त्‍याच्‍या कडेला फेकली गेली. यामध्ये हारुन बागवान गंभीर जखमी झाले. त्‍यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्‍या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्‍हिल पोलिस चौकीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT