सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप पुण्याला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. मात्र, शिक्षणाधिकारी जगताप आणि कार चालक हे सीट बेल्ट लावण्यामुळे दोघांचेही प्राण वाचले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप हे पुण्याला जात असताना अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात ते बचावले असून, त्यांना काहीही झाले नाही. पुणे उपसंचालक कार्यालयात मंगळवारी (दि.18) सुनावणी असल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप हे पुण्याकडे कारने निघाले होते. मोहोळ नजिक गेल्यावर त्यांच्या गाडीमध्ये दोष निर्माण झाला. त्यामुळे दुसरी कार मागवून ते पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान शेटफळ जवळ उसाच्या ट्रॉलीला कारची मागून धडक बसली. या धडकेत कारचा पुढील भाग चक्काचूर झाला.
सुदैवाने शिक्षणाधिकारी जगताप व चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे एअर बॅग उघडल्या. त्यामुळे कोणातेही इजा झाली नाही. मात्र, धडक बसल्यानंतर शिक्षणाधिकारी जगताप हे रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना या अपघातात कोणतीही इजा न झाल्याने रुग्णालयातून सोडून देण्यात आले.