म्हैसाळ : येथील सुरेश रामा बागडी (वय 50) यांचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 8.30 वाजता घडली. या घटनेची मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनेची फिर्याद किरण बागडी यांनी दिली आहे.
म्हैसाळमधील वैरण बाजारनजीक सोलापूर येथील ट्रक (क्र. एमएच 13 एएक्स 4037) विश्रांतीसाठी उभा होता. चालक ट्रक मागे घेत असताना ट्रकच्या मागे झोपलेल्या सुरेश बागडी यांच्या अंगावर ट्रकचे मागील चाक गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या जागेत अंधार असल्याने हा प्रकार चालकाच्या लक्षात आला नाही. मृत बागडी हा गवंडी काम करत होता. मृत सुरेश बागडी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.