श्रीपुर : बोरगाव - वेळापूर पालखी मार्ग उड्डाण पुलाजवळ पालखी मार्गावरून वाहन खाली येऊन व वेळापूर कडुन आयशर टेम्पो उड्डाण पुलाजवळ येऊन अपघात झाला. या अपघातात एक मुलगा मरण पावला तर 4 जण जखमी झाले असल्याची घटना रविवार दि. 8 जून रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, नेवरे (ता. माळशिरस) येथील विवाह सोहळ्यासाठी नेवरे येथील येथील रहिवासी व सद्या कुर्डूवाडी (ता. माढा) येथे कोचिंग क्लास घेत असलेले समाधान अभिमान व्यवहारे हे कुर्डूवाडी येथे राहतात. ते कुर्डूवाडी येथून नेवर येथे विवाह सोहळ्यासाठी स्विफ्ट गाडी नंबर (एम. एच. 45 ए. 3254) या कार गाडीने येत होते. तर त्याच मंगल कार्यालयामध्ये वेळापूर येथून आयशर टेम्पो नंबर (एम. एच. 13 आर. 2085) हा डीजे वाजवण्यासाठी नेवरे येथे निघाला होता. सकाळी 9.45 च्या सुमारास समाधान व्यवहारे शिफ्ट गाडी इंदापूर- पंढरपूर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून बोरगाव जवळ सर्विस रोड वरुन येत होते.
उड्डाणपुलाजवळ समाधान व्यवहारी यांची स्विफ्ट गाडी व वेळापूरहुन आयशर टेम्पो हे दोन्ही बाजूने गतिरोधक नसल्याकारणाने दोन्ही वाहने बोरगाव रोडवर उड्डान पुलाजवळ एकत्र आले. त्यामुळे दोन्ही वाहनांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये समाधान व्यवहारे यांचा मुलगा उत्कर्ष व्यवहारे (वय 10) मरण पावला. तर इतर चौघेजण जखमी झाले आहेत. तसेच आयशर डीजे टेम्पो ची पलटी होऊन नुकसान झाले आहे. तर स्विफ्ट कार गाडीचा पुढील भागाचा चुराडा झाला आहे.
स्विफ्ट गाडी मधील समाधान अभिमान व्यवहारे (वय 40) यांच्या हाताला मार लागला आहे. त्यांच्या पत्नी चांदनी व्यवहारे (वय 35) यांच्या पायाला मार लागल आहे. तर त्यांचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर पाहुण्याच्या मुलगा किरकोळ जखमी आहे. या सर्व जखमींना इनामदार हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एन. एच. 965 जी या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावर बोरगाव, वेळापूर व माळखांबी, उघडेवाडी या दोन्ही ठिकाणी पालखी मार्गाच्या उड्डाणपुलाजवळ वाहन चालकांना, मोटर सायकल चालकांना, नागरिकांना ये जा करताना दोन्ही ठिकाणच्या सर्विस रोडवर गतीरोधक बसविणे गरजेचे होते. मात्र, याकडे पालखी महामार्गाच्या संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी जाणीवपूर्वक गतिरोधकच बनवले नसल्याने या मार्गावरून वाहनांना येताना जाताना वेग असल्याने आतापर्यंत छोटे-मोठे अपघात झाले आहेत. गतिरोधक बनवण्याबाबत दुर्लक्ष करणार्या ठेकेदारावर कारवाई करावी. त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी बोरगाव माळखंबी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.