सोलापूर : शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे एस.टी.च्या धडकेत अज्ञात दुचाकीस्वार ठार झाला.
शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसातच्या सुमारास 30 ते 35 वर्षांचा अज्ञात इसम दुचाकीकवरून जात होता. छत्रपती संभाजी महाराज चौकातील सर्कलजवळ त्याच्या दुचाकीला कर्नाटकातील एस.टी. बसने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला फौजदार चावडी पोलीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी तो मयत झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.