Fraud Pudhari
सोलापूर

Solapur Loan Fraud : पाच कोटींचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने ९.९६ लाखांची फसवणूक

७ कोटी ४२ लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून प्री-सँक्शन लेटर पाठवले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत कमिशनपोटी ९ लाख ९६ हजार १५० रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी जयदीप दीपक पेंटर (रा. जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ) यांनी फिर्याद दिली असून सुष्मिता होटकर, प्रशांत होटकर (दोघे रा. संगमेश्वर नगर सोलापूर) आणि अक्षय सुरवसे या तिघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी सुष्मिता होटकर हिने ५ कोटी ५० लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे सांगत यूपीआय, फोन-पे, एनईएफटी व रोख स्वरूपात कमिशन घेतले. तसेच ७ कोटी ४२ लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे सांगून प्री-सँक्शन लेटर पाठवले.

संशयित आरोपी प्रशांत सिद्धेश्वर होटकर याने बंद बँक खात्याचा १० लाखांचा धनादेश दिला. मात्र, कर्ज मंजूर केले नाही किंवा पैसे परत केले नाहीत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT