Teacher  Pudhari
सोलापूर

Teachers News: शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या 41 मान्यता चुकीच्या

शिक्षकांच्या अडचणीत वाढ : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि स्मिता पाटील यांनी दिलेल्या एकूण 41 वैयक्तिक मान्यता चुकीच्या असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. त्यामुळे या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता घेतलेल्या शिक्षकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

शिक्षिका शीतल काळे यांच्यासह इतर 40 वैयक्तिक मान्यता चुकीच्या आहेत. त्याविषयी अहवाल शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविल्याची माहिती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी जगताप म्हणाले, तत्कालीन शिक्षणाधिकारी अंधारे यांच्या 33, पाटील यांच्या आठ अशा एकूण 41 वैयक्तिक मान्यता चुकीच्या आहेत. त्या रद्द करण्याची शिफारशी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे. त्यावर ते निर्णय घेणार आहेत. दरम्यान, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी अनेक चुकीच्या मान्यता दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक संघटनेचा माझ्यावर दबाव असून, मला काम करणे अवघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT