सोलापूर

Solapur News : जिल्ह्यातील ३२ कारखाने गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत

केवळ तीन कारखान्यांची धुराडी पेटली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पावसाअभावी यंदाचा उसाचा गाळप हंगाम एक महिना अगोदरच सुरू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ४० साखर कारखान्यांपैकी ३५ कारखाने गाळप हंगाम सुरू करतात. त्‍यातील फक्‍त तीनच कारखान्‍यांना गाळप परवाना मिळाला, तर कारखाने परवान्याच्‍या प्रतीक्षेत असून, त्‍यांना येत्‍या दोन ते तीन दिवसांत परवाना मिळेल, असा अंदाज प्रादेशिक (साखर) सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्‍यान, ​यंदा गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांमध्ये लोकमंगल ग्रुपचे दोन आणि जकराया कारखान्याचा समावेश असून, त्‍यांची धुराडी पेटल्‍याची माहिती समोर आली आहे.

६० ते ७० दिवस चालणार हंगाम

​यंदाच्या वर्षी पावसाअभावी बराचसा उसाचा शेतीपट्टा करपून गेला आहे. त्यामुळे उपलब्ध ऊस पाहता यंदा कारखाने अवघे ६० ते ७० दिवसच चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला आहे. त्‍यामुळे कारखादार कारखाना लवकरच सुरू करण्याच्या घाईत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT